काश्मीर दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा घणाघात

‘त्या’ तीन कुटुंबांनी काश्मीरसाठी काय केले?


श्रीनगर 

जम्मू-काश्मीरवर आत्तापर्यंत राज्य केलेल्या तीन कुटुंबांनी काय केले काश्मीरसाठी? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच अमित शाह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह सध्या तीन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज त्यांच्याहस्ते काश्मीरमधील आयआयटी संस्थेच्या कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भागवती नगरच्या सभेमध्ये बोलताना अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरवासीयांना प्रगती साध्य करून देण्याचा शब्द दिला. जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे नवे युग अवतरले आहे. जम्मूविषयी आधी अन्याय आणि भेदभाव होत असल्याचे चित्र होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या