धनगर समाजाचा दसरा मेळावा


जेजुरी प्रतिनिधी

महाराष्ट्राचे कुलदैवत तथा होळकर घराण्याचे आराध्यदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीमध्ये धनगर समाज बांधवांचा दसरा मेळावा जय मल्हार सांस्कृतीक भवन येथे नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये ओबीसी, व्हीजे एन टी, आरक्षणासंदर्भात व जात निहाय जनगणने संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली . या मेळावा साठी दादा भाऊ चितळकर, प्राध्यापक श्रावण देवरे यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी अनेक जिल्ह्यांतून समाज बांधव जमा झाले होते. या मेळाव्याचे आयोजन यशवंत क्रांती सेना व जनता राज अभियान चे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी केले होते. मेळाव्यासाठी जगन्नाथ पैकेकरी,सुरज सोट पाटील, दत्तात्रय गवते, रमेश लेंडे, यशवंत पडळकर, राजेंद्र जावळेकर, सुधाकर आव्हाड, विष्णुपंत गावडे, राजाराम पाटील, अप्पासाहेब आखाडे, संतोष आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक समाज बांधवांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान ज-हाड यांनी केले तर सुत्र संचालन व आभार आंधळे सर यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या