रशियात एका दिवसात एक हजार जणांचा मृत्यू


मॉस्को

रशियामध्ये करोना महासाथीचा थैमान सुरूच असून बाधितांची आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. रशियात शनिवारी करोना महासाथीच्या आजारामुळे १००२ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. रशियात करोनामुळे एकाच दिवसात बळी गेलेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. रशियात आतापर्यंत दोन लाख २२ हजार ३१५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

रशियन नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याने लसीकरण मोहिम धीम्या गतीने सुरू आहे. रशियन नागरिकांमध्ये लशीबाबत संभ्रम, अविश्वासाचे वातावरण आहे. त्यामुळेच लसीकरणाकडे पाठ फिरवली जात आहे. रशियाकडून 'स्पुटनिक व्ही' ही लस जगातील इतर देशांना पाठवण्यात येत आहे. मात्र, रशियातच करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या २४ कोटी झाली आहे. तर, ४८.८ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या