टी-२० वर्ल्डकपसाठीच्या संघात मुंबईचा शार्दूल


नवी दिल्ली 

आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठीच्या संघात बदल करून निवड समितीने अक्षर पटेलच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश केला आहे. याआधी शार्दुल राखीव खेळाडूंमध्ये होता आता तो मुख्य संघात आणि अक्षर राखीव खेळाडूंमध्ये गेला आहे.

पात्रता फेरीच्या लढती १७ ऑक्टोबरपासून सुरू असून त्यानंतर सुपर १२ मधील लढती २३ ऑक्टोबरला सुरू होतील. भारतीय क्रिकेट संघ पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी भारतीय संघ दोन सराव लढती देखील खेळेल.

बीसीसीआयने याआधी जाहीर केलेल्या संघात शार्दूल राखीव खेळाडूंमध्ये तर अक्षर मुख्य संघात होता. पण आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रात शार्दूलने पुन्हा एकदा गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे निवड समितीताल संघात बदल करणे भाग पाडले. या बदलाचे दुसरे कारण म्हणजे हार्दिक पंड्या होय. हार्दिकने आयपीएल मध्ये एकही ओव्हर गोलंदाजी केली. यामुळे संघाचे संतुलन बिघडत आहे. गेल्या काही काळात यावर अनेकांनी मत व्यक्त केले होते. आता शार्दुलचा संघात समावेश केल्याने तो हार्दिकचा पर्याय म्हणून संघात असेल.

शार्दुलने आयपीएलच्या या हंगामातील १५ सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून १८ विकेट घेतल्या आहेत. त्याची इकॉनमी ८.७५ इतकी आहे. चेन्नईकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या टी-२० मालिकेत शार्दुल भारतीय संघात होता. तर इंग्लंड दौऱ्यातील ओव्हल टेस्टमध्ये फलंदाजांनी त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या काही महिन्यात शार्दुल भारतीय संघातील ऑलराउंडरचा पर्याय म्हणून समोर येत आहे.

या शिवाय बीसीसीआयने खेळाडूंच्या तयारीसाठी काही खेळाडूंची निवड केली आहे. यात आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमान मेरीवाल, वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शहबाज अहमद आणि कृष्णप्पा गौतम यांचा समावेश आहे.

भारतीय संघातील खेळाडू 

 विराट कोहली (कर्णधार),रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या