ऐतिहासिक विजयस्तंभाच्या विकासासाठी 1 कोटींचा निधी मंजूर

पुणे -


महानगपालिकेने कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभासाठी दिलेल्या 1 कोटीच्या निधीमुळे या परिसराचा विकास करण्यास मोठी मदत होणार आहे. या रणस्तंभाला संपूर्ण देशासह जागतिक पातळीवर वेगळे महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षापासून देशाच्या विविध भागातून लाखो अनुयायी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतात.

 स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रसाने रासने व इतर सदस्यांनीमिळून हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. स्थायी समिती सदस्य नगरसेवक राहुल भंडारे याने विजयस्तंभाच्या विकासाठी निधीची मागणी केली होती.

महानगपालिकेने कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभासाठी दिलेल्या 1 कोटीच्या निधीमुळे या परिसराचा विकास करण्यास मोठी मदत होणार आहे.  

कोरेगाव- भीमाजवळ भीमा नदीकाठी 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या 500 शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या 30 हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शुरवीरांना हौताम्य आले. या धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला.तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासा येतात 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या