झेडपीच्या 128 शाळांचे मीटर काढले


पुणे प्रतिनिधी

तब्बल 128 शाळांचे मीटर काढून टाकण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 639 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी 2847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत आहे. मात्र, जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात आहेत. शाळांचे वीजबिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिल न भरल्याने 792 शाळांची वीजजोडणी तोडली आहे. तर तब्बल 128 शाळांचे मीटर काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळा अंधारात आहेत.

जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात गेल्या आहेत. वीजबील न भरल्याने जिल्हा परिषदेच्या या शाळांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे.

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर राज्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शहरात 8 ते 12 वी पर्यंत तर ग्रामीण भागात 5 वी ते 12 पर्यंत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळा-महाविद्यालये बंद होती. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये आता सुरु झाली आहेत. मात्र, 800 शाळांना नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विद्युत बिल न भरल्याने 800 शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या