मुंबई : शेअर बाजारातील पडझड कायम असून, आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 720 अंकांनी कोसळला . त्यानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरूच आहे, सध्या सेन्सेक्स 1420 अंकांनी कमी झाला असून 58 हजार अंकांपेक्षाही कमी पातळीवर व्यवहार सुरू आहेत. गुरुवारचा अपवाद सोडता या आठवड्यात प्रत्येक दिवशी सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये काही प्रमाणात वाढ झाली होती. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 58795 च्या पातळीवर पोहोचला होता. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा सेन्सेक्स तब्बल 1420 अंकानी घसरला आहे. याचा मोठा फटका गुंतवणुकदारांना बसत आहे.
0 टिप्पण्या