लासलगाव : यंदाच्या हंगामात प्रथमच नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारसमितीमध्ये प्रथमच लाल कांद्याची आवक झाली. केवळ दोनच वाहनांतून कांद्याची आवक झाली असली तरी वाहनांचे जग्गी स्वागत बाजारसमितीच्या आवारात करण्यात आले होते. लाल कांद्याला एक वेगळे महत्व आहे. पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या कांद्याला तब्बल 2301 रुपये असा दर मिळाला आहे. आवक कमी प्रमाणात असली तरी लाल कांद्याला मिळालेला दर शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे.
नाशिक जिल्ह्यात लासलगाव आणि नाशिक येथील बाजारपेठेतच कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. पण आता साठणूकीतला लाल कांदा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येवला बाजार समितीमध्ये आवक सुरु झाली आहे. खरीपातील लाल कांदा अद्यापही बाजारपेठेत दाखल झालेला नाही. शिवाय साठवणूकीतला कांदाही आता अंतमि टप्प्यात आहे त्यामुळे कांद्याचे दर पुन्हा वाढणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
0 टिप्पण्या