Breaking News

सहकार महर्षी नागवडे कारखाना ऊसाला 2600 भाव : अध्यक्ष राजेंद्र नागवडे       

लिंपणगाव( प्रतिनिधी )
सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखाना चालू ऊस गाळपास 2600 रुपये अंतिम भाव देणार असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

        यावेळी कारखान्याच्या अतिथीगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे पुढे म्हणाले की, कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्यापासून 1 लाख 73 हजार क्रॉसिंग गाळप झालेले आहे. कारखान्याचा गाळप हंगाम अत्यंत शिस्तबद्ध व अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या गाळपात नागवडे कारखान्याची जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची रिकव्हरी आहे. दररोज 6300 कारखाना ऊस गाळप करीत असून, कोजन प्रकल्प इथेनॉल प्रकल्पाचे देखील नियोजन सुरू आहे. असे सांगून श्री नागड पुढे म्हणाले की ,जिल्ह्यातील साखर कारखान्याने एफ आर पी ची रक्कम कशी द्यायची आहे ते त्या त्या कारखान्यांनी भाव जाहीर केले आहेत. मागील गाळपास नागवडे कारखान्याने 25 10 रुपये हायेस्ट भाव दिला. चालू वर्षी देखील नागवडे कारखाना ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेत संचालक मंडळाने 2600 रुपये अंतिम भाव देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून गाळप झालेल्या उसास पहिला हप्ता  2250 रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर लवकरच वर्ग करणार आहोत. जिल्ह्यात इतर कारखान्यापेक्षा नागवडे कारखानाचा भाव अधिक असणार आहे. तसा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की ,सहकार महर्षी आदरणीय शिवाजीराव नागवडे बापू यांनी नेहमीच ऊस उत्पादक सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून ऊस भावा संदर्भात निर्णय घेतलेले आहेत . सहकारी साखर कारखाना चालवत असताना आदरणीय सहकार महर्षी बापूंनी घालून सहकारी साखर कारखानदारी संदर्भात तत्व, शिस्त व काटकसर या बाबी संचालक मंडळाने राबवले आहेत. त्यातून ऊस उत्पादक व सभासदांच्या हिताला प्रथम प्राधान्य देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.

        चालू वर्षी कारखाना कमीत कमी फेब्रुवारी मार्चपर्यंत गाळप करणार आहे. साधारणता आठ लाखापर्यंत गाळपाचे कारखान्यासमोर उद्दिष्ट आहे. असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की, साखरेचे भाव वाढवले पाहिजे. एफ आर पी व कामगारांचे पगार वाढवले आहेत. साखर कामगारांना लवकरच 12 टक्के पगारवाढ करणार आहोत. सहकारी साखर कारखानदारीला काही शासनाने बंधने घालून दिलेले आहेत. रिकव्हरी नुसार सहकारी साखर कारखाना ऊस भाव जाहीर करावा लागतो. मागील गाळपास 2510 चा दर होता तो आता चालू वर्षी 2600 पर्यंत अंतिम भाव वाढवला आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नागवडे कारखानालाच होऊ द्यावा. 
          
            यावेळी पत्रकार परिषदेस कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाष राव शिंदे हे उपस्थित होते

No comments