राज्यसेवेच्या 390 जागांसाठी अडीच लाख अर्ज, MPSC कडून पूर्व परीक्षेच्या तारखेवर शिक्कामोर्तब

 


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 चं आयोजन 2 जानेवारी 2022 रोजी घेण्याचं निश्चित केलं आहे. राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी परीक्षा घेण्याचं निश्चित केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जाहीर केली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 251589 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती आयोगानं जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ज्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क जमा करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती त्यांना पुन्हा एक संधी दिली होती. विद्यार्थ्यांनी परीक्षा शल्क जमा केल्यानंतर आयोगानं परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या जाहीर केली आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या