Breaking News

आर्यनला सोडवण्यासाठी गोसावी आणि प्रभाकरने शाहरुखच्या स्टाफकडून 50 लाख घेतल्याचा सॅम डिसूजाचा दावा


मुंबई

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सोमवारी नवा ट्विस्ट आला. या प्रकरणातील साक्षीदार असलेला सॅम डिसूझा अनेक दिवसांनी अचानक एबीपी न्यूज चॅनलसमोर हजर झाला आणि त्याने दावा केला की शाहरुख खानचे कर्मचारी आणि आर्यन प्रकरणात साक्षीदार बनलेल्या काही लोकांमध्ये सौदा झाला होता. या डीलमध्ये किरण गोसावी आणि प्रभाकर सइल यांचा हात असल्याचे सॅमने सांगितले. दोघांनी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी यांच्याकडून टोकन मनी म्हणून 50 लाख रुपये घेतले होते.

गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर याने 25 कोटी रुपयांविषयी सांगितले होते

याआधी प्रभाकर सैल यांनी दावा केला होता की, आर्यन खान प्रकरणातील 25 कोटींच्या डीलवर केपी गोसावी आणि सॅम डिसूझा यांना बोलताना त्यांनी ऐकले होते. गोसावी आणि सॅम यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना आठ कोटी रुपये देण्याचे कथित आश्वासन दिल्याचा दावा प्रभाकरने केला होता. या आरोपावर सॅमने स्पष्टीकरण दिले आहे.

त्यामुळेच शाहरुखच्या कर्मचाऱ्यांना परत केले पैसे

सॅमच्या म्हणण्यानुसार, प्रभाकर आणि गोसावी एकत्र गेम खेळत असल्याचा संशय त्याला आला, म्हणून त्याने पूजा ददलानीला पैसे परत केले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना या कराराची माहिती नव्हती असेही सॅमने सांगितले. हा सगळा खेळ किरण गोसावी आणि प्रभाकर यांनी मिळून रचल्याचा आरोपही सॅमने केला आहे.


No comments