आदर्श उपसरपंच पुरस्काराबद्दल करांडे यांचा सत्कार


नगर
 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ, नगर तालुका यांच्यावतीने सामजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नगर तालुक्यातील दरेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल करांडे यांना आदर्श उपसरपंच या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचा नुकताच पीपल्स रिपब्लिकन पार्टी, जितेंद्र आव्हाड युवा मंच व प्रणव जोत सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक रभा करांडे, आदर्श शेतकरी बळीराम पाटील बेरड,पत्रकार महेश भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब ढवळे, माजी सरपंच लीला लुंगसे, लीला शिंदे, ओबीसी महासंघाच्या वनिता बडवे,सामजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवा जिल्हाअध्यक्ष अतुल भिंगारदिवे,अनिकेत आरोळे, विष्णु जाधव, नंदा जगताप, देविदास सरोदे त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणव जोत सोशल फाउंडेशनचे उप अध्यक्ष सुरेश भिंगारदिवे यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या