ऊस बैलगाडी व जड वाहनांना "रिफ्लेक्‍टर'' लावणे बंधनकारक


सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

रात्रीच्या प्रवासात अपघात होऊ नये, वाहनांमध्ये सुरक्षित अंतर राहावे, यासाठी  ऊसतोड बैलगाडी व जड वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड बसवणे हा कार्यक्रम बुधवार दि 3  रोजी श्री सोमेश्वर कारखाना (ता बारामती) येथे संपन्न झाला यावेळी रिफ्लेक्टर बोर्ड  सर्व कारखाना ऊस वाहनांना व बैल गाडी यांना बसवणे बंधनकारक आहे असे श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले . चालकांनी याची अंमलबजावणी न केल्यास त्यांच्या वाहनांची योग्यता तपासणी रद्द होणार आहे. व त्यावर पोलीस प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई होणार असल्याचे कार्यक्रम  प्रसंगी उपस्थित असणारे वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनीही वाहतूकदार यांना बजावले.

रस्त्यावरील वाहनांचे वाढते अपघात लक्षात घेऊन त्यानुसार वाहनांच्या दोन्ही बाजूंना मान्यताप्राप्त वितरकाकडून प्रमाणित परावर्तक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. परावर्तक, रिफ्लेक्‍टर टेप, बोर्ड  आणि वाहनाच्या मागील बाजूला रिअर मार्किंग प्लेट बसवणे अनिवार्य असेल. त्यामुळे रात्री रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना सुरक्षित अंतर ठेवण्यास मदत होईल.

सध्या बाजरात असलेल्या परावर्तकांचा दर्जा निकृष्ट असल्याने रात्रीच्या प्रवासात वाहनांमधील अंतराचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्‍यता असते. म्हणू शासन प्रमाणित परावर्तक बसवल्यास लहान वाहनांना मोठ्या वाहनांचा अंदाज येईल. असेही धडे यावेळी देण्यात आले.

याप्रसंगी ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड लावताना  सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हाईस चेअरमन शैलेश रासकर अध्यक्ष राजवर्धन शिंदे ,नवनिर्वाचित संचालक ऋषी गायकवाड, जितेंद्र निगडे, वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे , बापूराव गायकवाड शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड , सुपरवायझर योगेश पाटील ,वाहतुकदार   कैलास मगर ,बैलगाडी पुरवठा वाहतूकदार तसेच पत्रकार बंधू व मान्यवर उपस्थित होते.

सध्या सोमेश्वर चा गळीत हंगाम काही दिवसांपूर्वी  चालू झाले आहे ,तरी ऊस वाहतूक करण्यासाठी आलेल्या  वाहनांनी येत्या आठ दिवसात रिफ्लेक्टर व वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत न पाळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

- एपीआय सोमनाथ लांडे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या