सहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा विचार करावा : पद्मश्री पवार


भाळवणी प्रतिनिधी

सहकारी संस्थांमध्ये काम करत असताना संचालकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सभासदांच्या हिताचा विचार करून कारभार करावा असे आवाहन राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. 
   भाळवणी (ता. पारनेर) येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांना दिपावलीनिमित्त श्री. पवार यांच्या हस्ते साखर वाटप करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही संस्थेमध्ये काम करत असताना त्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण न करता राजकीय जोडे बाजूला ठेवून सभासदांच्या हिताचा विचार करून कारभार करावा त्यामुळे सभासदांना संस्थाही आपली वाटेल. आतापर्यंत बेलगाम काम करणार्‍या संस्था धुळीस मिळाल्या असून अनेक संस्थांच्या संचालकांवर गुन्हे दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले. 
   यावेळी सरपंच लिलाबाई रोहोकले, संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मंजाबापू रोहोकले, एस.टी. पादीर सर, पं. समितीचे माजी सदस्य गंगाराम रोहोकले, नानासाहेब रोहोकले, संचालक गंगाधर रोहोकले, प्रभाकर रोहोकले, लक्ष्मण चेमटे, त्रिंबक भाऊ रोहोकले, सावळेराम मोळके, रविंद्र कपाळे, ताराबाई रोहोकले, गिरजूभाऊ रोहोकले, दगडूभाऊ कपाळे, मंजाभाऊ चेमटे, बबलू रोहोकले, माजी सरपंच बबनराव चेमटे, रंगनाथ रोहोकले, संस्थेचे सचिव मुरलीधर रोहोकले, सदाशिव रोहोकले, अनिल लकडे आदींसह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या