पुलाच्या संरक्षक कठाड्यांना लागला मुहूर्त


आळंदी 

श्री श्रेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलाचे संरक्षक कठाडे वाहून गेल्याने येथील हा पूल धोकादायक असल्याचं वेळोवेळी विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदन देऊन सांगण्यात आले होते, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने श्री क्षेत्र आळंदी येथे भरल्या जाणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर या पुलावरील संरक्षक कठाडे बसवण्याचा मुहूर्त अखेर प्रशासनाला सापडला आहे. परंतु हे संरक्षक कठडे पूर्वी प्रमाणे जसे होते तसेच बसवण्यात आले आहे,भविष्यात पुन्हा येणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा हे  संरक्षक कठडे वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात केलेली ही मलमपट्टी किती दिवस टिकेल सांगता येत नाही. हे संरक्षक कठडे चांगल्या दर्जाचे बांधणे गरजेचे असून या पुलावरून येणारे भाविक कार्तिकी आणि आषाढी यात्रेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी या पुलाचा वापर करत आहे. त्या दृष्टिकोनातून या पुलाचे कठडे हे कायमस्वरूपी तत्त्वावर बांधण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या