विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याच्या बछड्यांना जिवदान


वळती प्रतिनिधी 

आंबेगाव तालुक्यातील वळती येथे  भिमाजी गणपत आजाब विहिरीत दोन बिबटयाचे बछड्यांना पडलेल्या मोटर चालु करण्यासाठी गेले असता लक्षात आले. त्यानीं लगेच वन खातेला फोन द्वारे कळवले. वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर स्मिता राजहंस घटनास्थळी जाऊन वनविभाग  रेस्क्यू टिम मेंबर आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याच्या  बछड्यांना बाहेर काढण्यात आले व पुढील उपचारासाठी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्र येथे पाठवण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही आर वेलकर वनपाल वळती, वनपाल आरुडे एस एस दहातोंडे, वनरक्षक संपत भोर, व रेस्क्यू टीम सदस्य स्थानिक ग्रामस्थांच्या  मदतीच्या सहाय्याने विहिरीतून  बिबट्याचा बछड्यांना बाहेर काढले.        

हे वेळेस बिबट्या पासून कसे संरक्षण करायचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर स्मिता राजहंस यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या