Breaking News

कुशल बद्रिकेच्या साथीने भाऊ कदम करणार प्रेक्षकांचे मनोरंजन


मुंबई : ‘बुर्रूम बुर्ऱुम’ म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूची आणि केळेवाल्या उषाची सध्या सर्वत्र जोरदार हवा आहे. ‘पांडू’ चित्रपटातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके त्यांच्या जोडीला हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सोबतीला हेमांगी कवी, प्रवीण तरडे आणि प्राजक्ता माळी यांसारखे नावाजलेले कलाकार, अशा स्टारकास्टने सजलेल्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर आज (24 नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांचे आहे. येत्या 3 डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

No comments