पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वर अंत्यसंस्कार


पुणे प्रतिनिधी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे वृद्धापधापकाळाने निधन झाले. आज पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. नुकतेच त्यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. 

प्रचंड व्यासंग, उत्साहाचा धबधबा असल्याने भव्यदिव्य अन् हिमालयाहून अधिक उंचीचे एकाहून एक सरस असे उपक्रम अखेर पर्यंत करणारी प्रेरणाज्योत विझल्याने सह्यगिरीतील गडेकोट अन दऱ्याखोऱ्या मुक्या झाल्या.

आज सकाळी त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दर्शन घेण्यासाठी व त्याच्या वर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्या चाहत्यांसह, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टीळक,उपमहापौर सुनीता वाडेकर, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सुनील महाजन, अभिनेते राहुल कोल्हापूरकर,

पुणे महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगसेवक, व पुणे विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वर शासकीय पद्धतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे जगभरातुन शोक व्यक्त होत आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आम्हाला खूप दुख झाले आहे. त्यांनी आम्हा सगळयांना शिवाजी महाराजानी केलेल्या कामाचे महत्व सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या