माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा वीज वितरणच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

 शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या निषेधार्थ...


नेवासा/प्रतिनिधी/सुधीर चव्हाण

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्याचे जयहरि नावाने प्रसिद्ध असलेले भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला.मात्र श्वास गुदमरल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

       नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मंगळवारी विद्युत कंपनीच्या ऑफिसमध्ये सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केले    


     माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याशी चर्चा करतांना सांगितले की  आज शेतकरी खूप अडचणीत आहे, शेतकऱ्याकडे कुठलेही पिकं सध्या हातात नाही साखर कारखाने नुकतेच चालु झाल्यामुळे अजून शेतकऱ्याकडे उसाचेही पेमेंट आले नाही त्यामुळे आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी व आत्ता विद्युत कंपनीने तीन हजार रुपये भरून घ्यावे अशी विनंती केली

    मात्र  वीज कंपनीचे अधिकारी ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते त्यानंतर नेवासा येथील तहसीलदार  रूपेश सुराणा हे ही उपस्थित झाले त्यांनी ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावर तोडगा न निघाल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विद्युत कंपनीच्या ऑफिसमध्ये गळफास  घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील शेतकरी व आंदोलन करते वेळी दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला नाही तर एका माजी लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या वीज पंपासाठी प्राण गमावण्याची वेळ आज नेवासा मध्ये आली होती

       तरीही गेंड्याचे कातडाचे असणारे या अधिकाऱ्यांना थोडासाही शेतकऱ्याचा कळवळा आला नाही अशा प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी बोलतांना दिल्या.माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी व जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी विद्युत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही फोन करून चर्चा केली तरीही त्यावर ती तोडगा निघाला नाही सर्व आंदोलनकर्ते दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत ऑफिसमध्येच ठिय्या आंदोलन करत होते   

      यावेळी  तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी मध्यस्थी करून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांसाठी रोज एक तास वीज चालू ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन वीज बिलांची होळी करून स्थगित करण्यात आले परंतु या प्रश्नांबाबत येत्या दोन चार दिवसांमध्ये नेवासा तहसील कार्यालयावर  भव्य ट्रॅक्टर मोर्चा नेऊन कृषी पंपाचे वीज आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली

      यावेळी बाळासाहेब मुरकुटे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, राजेंद्र मते,अशोकराव टेकणे सर,बाळासाहेब शिरसागर, इंजीनियर नगरसेवक सुनीलराव वाघ,भाजपचे शहराध्यक्ष मनोजभाऊ पारखे,विश्वासराव काळे, येडूभाऊ सोनवणे, कैलास दहातोंडे, आप्पासाहेब आयनर, दिगंबर गोंधळी,कल्याणराव मते, निवृत्ती जावळे, विशाल धनगर, अण्णापाटील गव्हाणे,रमेश घोरपडे,बाबा डुकरे, राजेश कडू, संभाजी गडाख अरुण चांदगुडे विशाल धनगर सुभाष पवार महिंद्रआगळे दिलीप नगरे बाबासाहेब शिंदे. डुकरे बी.के राजेंद्र जाधव. किरण जावळे बापूसाहेब डिके रमेश घोरपडे, कानिफनाथ सावंत,उमेश चावरे,आदिनाथ पटारे,अरुण निपुंगे,रमेश महानुर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या