नक्षलवाद्यांशी चकमकीत सावखेडचा भूमीपुत्र शाहिद

mangalsingh pardeshi

जळगाव

पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रूक येथील ३५ वर्षाचा जवान नक्षलवाद्यांशी लढतांना शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे शहीद झाला. ही माहिती मिळताच वृद्ध आई वडील, दोन भावंडासह नातेवाईक व गावकऱ्यांनी आक्रोश केला. शहीद जवानाचे पार्थीव सोमवारी विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथून लष्कराच्या वाहनातून गावी आणल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पाचोरा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेडा बुद्रूक येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय ३५) हा सन - २००५ मधे अलीबाग येथे भारतीय सैन्यात भर्ती झाल्यानंतर त्याने सिकंदराबाद येथे प्रशिक्षण घेतले होते. सन २०१४ मधे त्याचा मोंढाळे ता. भुसावळ येथील मुलीशी विवाह झाल्यानंतर त्यास दोन मुली व एक मुलगा असे तीन आपत्य आहेत. पत्नी व कुटुंब मंगलसिंग जयसिंग सोबतच राहत होते.

मंगलसिंग जयसिंग परदेशी हा दसऱ्यानिमित्त एक महिन्यासाठी घरी आपल्या कुटुंबासह सुटीवर आला होता. दि. ३० ऑक्टोबरला सुटी संपल्यानंतर पठाणकोट येथे सेवेत हजर झाला होता. या वर्षातील डिसेंबर अखेर सुटी संपल्याने गावी चार ते पाच रविवारी भैरवनाथाची यात्रा भरत असल्याने पुढील वर्षी जानेवारी महिन्यात यात्रेसाठी एक महिन्याच्या सुटी घेऊन कुटुंबीयांसह सुटीवर येणार असल्याचे जातांना सांगून गेला होता. मंगलसिंग जयसिंग परदेशी याचा स्वभाव सतत हसरा व मनमिळावू होता. नवनवीन मित्र जमविणे, त्यांच्याशी मैत्री करणे हाही त्याचा स्वभाव गुण होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या