पावसाळा सरला, खड्डे कायम


सोमेश्वरनगर 

बारामती तालुक्यातील करंजेपुल ते मोरगाव रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न आत्ता गंभीर होत चालला आहे. गुरुवारी दि १८रोजी असणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेला सोमेश्वर मंदिर मध्ये दिवा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी या रस्त्याची दुरवस्था बद्दल सांगितले की करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर अवघ्या तीन किलोमीटर अंतर आहे परंतु मंदिर पर्यंत खड्डे चुकवत जीव धोक्यात घालून आम्हाला प्रवास करावा लागतो मंदिर पर्यंत   अर्ध्या तास हुन अधिक वेळ लागत आहे बुधवारी झालेल्या पावसाने अगण्य असणाऱ्या खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने अंदाज न आल्याने काही वाहने रस्ता सोडून बाजूला गेल्याच्या घटनाही झाल्या आहे..

चालू वर्षीचा सोमेश्वर चा ऊसगळीत हंगाम चालू झाल्यामुळे ऊस बैलगाड्या व ऊस वाहतूकदार या खड्ड्यांमुळे त्यांची रस्त्यावर सतत कोंडी दिसत आहे व दुचाकी वाहनांना प्रवास करताना अडचण निर्माण झाले आहेत पावसाळा सरून काही महिन्याचा काळ लोटला तरी ग्रामीण भागातील  रस्त्यांवरील खड्डे अद्यापही कायम असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देत बुजवावेत अशी अपेक्षा येणाऱ्या भाविकांनी व्यक्त केली .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या