म्हाडाची येत्या सात जानेवारीला सोडत

mhada

पुणे प्रतिनिधी

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास (म्हाडा) मंडळातर्फे पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात उभारलेल्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. पुण्यातील म्हाडाच्या कार्यालयात येत्या सात जानेवारीला सकाळी दहा वाजता ही सोडत काढण्यात येईल.त्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकृतीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी उपस्थित होते. पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ४ हजार २२२ सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीस आजपासून सुरवात झाली. म्हाडाच्या 'जानेवारी २०२२-ऑनलाइन सोडत' योजनेमुळे गरजू नागरिकांचे पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या