गोविंद बाग पाडव्या दिवशी पुन्हा कार्यकर्त्यांनी गजबजणार...!


बारामती

बारामती यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिवाळीच्या पाडव्यादिवशी गोविंद बागेत दिवाळी भेट कार्यक्रम होणार असून संपूर्ण पवार कुटुंबिय जनतेची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी (दि:१) रोजी दिली आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी पवार कुटुंबांशी होणारा दिवाळी भेटीचा कार्यक्रम रद्द केला होता. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गोविंद बागेत दिवाळी भेट  कार्यक्रम होणार असून संपूर्ण पवार कुटुंबिय जनतेची भेट घेणार आहेत. गोविंद बागेत दरवर्षी दिवाळीच्या पाडव्यादिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते येत असतात.यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियमांचे पालन करून गोविंद बागेत पाडव्यादिवशी कार्यक्रम होणार

दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत असतात. एकत्रित दिवाळीचा सण साजरा करतानाच पाडव्यादिवशी राज्यातील जनतेलाही शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून  अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या