गडाखांची तिसरी पिढी झाली सक्रीय : राजकारण आणि शैक्षणिक जबाबदारी



सोनई : जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यानंतर तिसऱ्या पिढीतील उदयन गडाख यांचा राजकीय मैदानात यशस्वी उदय झाल्यानंतर आता प्रशांत गडाख यांची कन्या नेहल हिने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले आहे. नेवासे तालुक्यात 'नवी पिढी नवी जबाबदारी'चे स्वागत होत आहे.

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन सध्या तालुक्यातील सुखदुःखात सहभागी होत मंत्री गडाखांचे काम हलके करत आहेत.त्यांनी केलेले युवा संघटन संघटनेला लाभदायक ठरत आहे.प्रशांत यांच्या पठडीत तयार झालेला उदयन सध्या युवकांबरोबरच जेष्ठांचाही प्रिय झाला आहे. संपर्क, भेटीगाठी आणि कामांचा पाठपुरावा मार्गी लागत असल्याने संघटनेचे बळ निश्चितच वाढले आहे.

युवानेते गडाख यांची नव्याने मुळा एज्युकेशन संस्थेच्या उपाध्यक्षपदी तर प्रशांत यांची कन्या नेहल हिच्यावर स्व.यशवंतराव चव्हाण मेमोरियल च्या विश्वस्तपदाची जबाबदारी पडली आहे.निवड झालेल्या दोन्ही संस्था मोठ्या असुन राज्यात नाव आहे.नवा गडी नवे राज्य प्रमाणे नव्या निवडीचे शिक्षकवृंद, कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांतून स्वागत होत आहे.राजकीय व शैक्षणिक वाटचालीची सर्वाना उत्सुकता लागली आहे.

नेवासे तालुका पूर्वी नगर आणि शेवगाव विधानसभा मतदार संघासाठी जोडलेला होता. शेवगाव आणि नगर तालुक्यातीलच आमदार निवडून जायचे आणि नेवासे तालुक्याची फरफट ठरलेली असायची. नेवासे स्वतंत्र विधानसभा मतदार संघ होवून पहिले आमदार गडाख झाले. त्यांनी रस्ते,वीज व जलसंधारणचे मोठे काम केले होते. शासनाच्या निधीशिवाय त्यांनी 2013 मध्ये तीन कोटी रुपयांहून अधिक खर्च करीत 300 पाणी साठवण बंधारे, पाझर तलाव, गावतळी व साखळी बंधाऱ्याची दुरुस्ती, खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढला होता.दुष्काळी कामाचा हा नेवासे पॅटर्न राज्यात चर्चेत आला होता.या केलेल्या कामाचा फायदा आजही शेतकऱ्यांना होत आहे. अशीच दृष्टी उदयन गडाख मध्ये असल्याचे बोलले जात आहे.

यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी सामाजिक,शैक्षणिक व सेवाभावी कार्यात उल्लेखनीय काम केले मात्र त्यांची खरी ओळख राजकीय आराखडे व परफेक्ट नियोजनकर्ता म्हणून आहे. मरणोत्तर नेत्रदान, वृक्षारोपण, गाव तेथे वाचनालय, गरजू मुलींचे शैक्षणिक पालकत्व असे मोठे उपक्रम दिशादर्शक ठरले आहेत. त्यांची कन्या नेहल हिच्यावर वैद्यकीय शिक्षण संस्थेची जबाबदारी पडली असुन याही क्षेत्राला यशाची प्रकाशवाट निश्चित मिळेल असे टीमवर्क प्रशांत पाटील गडाख यांनी तयार करुन ठेवलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या