मनसे एस टी कर्मचा-यांसोबत आहे- गणेश रांधवणे


शेवगाव प्रतिनिधी 

एसटी चे शासनात विलिनीकरण करावे या प्रमुख मागणी साठी राज्य भर एसटी कर्मचारी संपावर आहेत. शेवगाव आगारात काही दिवसापूर्वी कर्मचारी दिलीप काकडे यांनी शेवगाव आगारात गळफास लावून आत्महत्या केली.यातून महाराष्ट्र भर आंदोलनाचा भडका उडाला. मनसे प्रत्येक वेळी या कर्मचा-यांच्या पाठीशी ठाम पणे उभी राहीली. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात विविध ठिकाणी मनसे या  आंदोलनात सहभागी झाली आहे. याचाच एक भाग म्हणून आज शेवगाव आगारातील कर्मचारी बांधवाना संपासाठी शेवगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे बोलत होते. एस टी कर्मचा-यावर शासन कायमच अन्याय करत असून एस टी कर्मचारी आर्थिक, मानसिक व शारीरिक अडचणीत आणण्याचे पाप महाविकास आघाडी करत असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. शासनाने लवकरात लवकर एस टी चे शासनात विलिनीकरण करावे अन्यथा राज्यभर मोठ्या आंदोलनाचा भडका उडेल व महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळप्रसंगी रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी  उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, उपतालुकाध्यक्ष संजय वणवे, व एस टी कर्मचारी संघटनेचे दिलीप लबडे यांनी देखील आपली भुमिका मांडली.यावेळी उपतालुकाध्यक्ष रामेश्वर बलिया,देविदास हुशार, गणेश डोमकावळे, महाराष्ट्र नवनिर्माण रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाचे तालुका अध्यक्ष ईंजि.सागर आधाट, प्रसाद लिंगे यांच्या सह एस टी कर्मचारी दिलीप लबडे,संजय धनवडे, संतोष सोंडे, दिलीप बडधे इस्माईल पठाण, लक्ष्मण लव्हाट,अजय कराड रावसाहेब जाधव,भाऊ साहेब लिंगे, अविनाश खडांगळे यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने एस टी कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या