Breaking News

प्रियकराकडून रिपाइं महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या!

आर्थिक वादातून चाकूने केले 30 वार


नाशिक 

दोन खुनांच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून बाहेर आलेल्या प्रियकराने रिपाइं पदाधिकारी असलेल्या प्रेयसीवर तब्बल 30 वार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज दिवाळीच्या दिवशीच गंगापूर रोडवरील संत कबीर नगर झोपडपट्टीत घडली आहे.

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या दोघांमध्ये आर्थिक वाद झाल्याने ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले असून या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पूजा संदीप आंबेकर असे आरपीआयच्या मृत महिला पदाधिकाऱ्याचे नाव असून संतोष विष्णू आंबेकर असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच संतोष आंबेकर हा दोन खुनांच्या गुन्ह्यात शिक्षा भागून जेलमधून बाहेर आला होता. तसेच 10 ते 12 दिवसांपासून पूजा हिच्यासह झोपडपट्टीतील एका पत्र्याच्या घरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. दोघांमध्ये आर्थिक वादातून भांडणे होत होती. अशातच गुरुवारी सकाळी दोघांत पैशाच्या वादातून भांडण झाले.

तेव्हा संतप्त संतोष आंबेकर याने धारदार चाकू काढून पूज्या हिच्या गालावर, पोटावर आणि मानेवर तब्बल 30 वार केले. त्यामुळे अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष आंबेकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


No comments