Breaking News

मडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाची बदली करा अथवा शाळेला टाळे ठोकू-ज्ञानेश्वर लबडे. शिक्षकाला वैतागले ग्रामस्थ.
 नेवासा- तालुक्यातील मडकी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बद्रीनाथ चव्हाण यांची बदली करावी या मागणीसाठी शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लबडे व ग्रामस्थ यांच्याकडून गटविकास   अधिकारी ,गटशिक्षणाधिकारी यांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे. सदर तक्रार अर्जात म्हटले आहे की, मडकी येथील जिल्हा परिषद  शाळेत सेवेत असले शिक्षक बद्रीनाथ चव्हाण हे कायम अनुपस्थित असतात शाळेत आले तरी मुलांना शिकवण्या ऐवजी मोबाईल मध्ये व्यस्त असतात विद्यार्थ्यांकडे लक्ष नसल्याने गावातील कोणत्याही मुलांमध्ये शैक्षणिक प्रगती दिसून येत नाही यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत गावातील शाळा व्यवस्थापक समितीने गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करून देखील कुठलीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यानंतर या शिक्षकांना ग्रामस्थांनी समजावून सांगितले मात्र त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल झाला नाही तरी या शाळेतून त्यांची तात्काळ बदली करावी अन्यथा सर्व ग्रामस्थ व पालक समिती च्या वतीने शाळेला टाळे ठोकणार असल्याचे निवेदनात म्हटले सदर निवेदनावर ज्ञानेश्वर लबडे, काकासाहेब लबडे, किशोर लबडे ,देविदास सोनवणे, सुनील लबडे , शेखर लबडे, पोपटराव लबडे ,अरुण बिडगर यांच्या सह्या आहेत.ग्रामस्थांच्या तक्रार अर्जावर चौकशी करून कारवाई प्रस्थावित आहे सदर शाळेवर २ दिवसात पर्यायी शिक्षक नेमणूक करण्यात येईल-सुलोचना पटारे , गटशिक्षणाधिकारी

No comments