हजरत टिपु सुलतान जयंती उत्साहात


बोधेगाव प्रतिनिधी

डी. जे. च्या तालावर थिरकुन हजरत टिपु सुलतान समजणार नाहीत तर वैचारिकरित्या त्यांना समजावुन घेतल्यावर ते कळतील, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरूध्द रणांगण गाजवलेल्या मुस्लिम समाजातील महापुरुषांचे योगदान समाजासमोर यावे ही काळाची गरज आहे, शेतकरी हिताला विरोध करणारा संपूर्ण मानवजातीचा शत्रु आहे असे परखड मत मांडणारे इंग्रजांविरोधात लढलेले पहिले स्वतंत्रता सेनानी, कुशल प्रशासक, मिसाईलचे जनक म्हणजे हजरत टिपु सुलतान होय. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हजरत टिपू सुलतान यांचे मोठे योगदान आहे. असे मत बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आजिम पठाण यांनी व्यक्त केले. 

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ईदगाह काँर्नर बॉईज बोधेगाव शहरच्या वतीने हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आजीम पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आजीम पठाण, जावेद तांबोळी, शोएब शेख, अल्ताफ मणियार, समीर मणियार, अफसर मनियार, नौशाद शेख, परवेज शेख यांच्यासह ईदगाह कॉर्नर बॉईज ग्रुपचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या