पोलीस दलातील ३ जणांना बढती


भोर 

भोर पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार बढती देण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी नुकतेच बढतीचे आदेश पारित केले आहेत.

भोर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अमोल भागोजी मुऱ्हे यांना पोलीस हवालदारपदी बढती देण्यात आली असून पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शांताराम खेंगरे आणि मच्छिंद्र बबन कराडे यांना पोलिस नाईक पदावर बढती देण्यात आली आहे. उत्तम जनसंपर्क आणि संवाद कौशल्य असलेले मुऱ्हे यांनी अल्पावधीत अनेक जटिल गुन्ह्यांचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून तालुक्यात अतिवृष्टी दरम्यान सामाजिक भान ठेवून दुर्गम भागात मदत केली आहे. तर शांत आणि मितभाषी ओळख म्हणून असलेले खेंगरे आणि कराडे कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून परिचित आहेत. सेवाकार्यात भरती मिळाल्याने सध्या भोर पोलिसात आनंदाचे वातावरण आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या