विनाअनुदानित शिक्षकांची 'संघर्षागाथा' हृदयस्पर्शी : करण नवले


अजनुज प्रतिनिधी

विनाअनुदानित शिक्षकांच्या किरण चव्हाण लिखीत संघर्षगाथा पुस्तक हृदयस्पर्शी घाव घेणारे आहे असे दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले यांनी म्हटले आहे. नवले हे श्रीगोंदा दौऱ्यात काष्टी येथे संघर्षगाथा पुस्तक त्यांना देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

नवले यांनी पुढे सांगितले की, विनापगारी शिक्षकांचे जीवन अतिशय खडतर असून जीवन कसे जगावे हा त्यांच्या समोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. शिक्षकांच्या व्यथा वाचल्या तर मन सुन्न होते. जीवनात किती संघर्ष करावा याला देखील मर्यादा आहेत. 

 दैनिक राष्ट्र सह्याद्रीने शिक्षकांच्या प्रश्नी नेहमीच वाचा फोडण्याचे काम केले असून कोरोनाच्या महामारीत काही शिक्षकांच्या जीवन मरणाच्या वेळी काही बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यातून अनेक मदतीचे हात पुढे आले म्हणून त्यांना अन्नाचे दोन घास मिळाले. या पुस्तकातून वास्तववादी परिस्थिती समाजा समोर आल्या शिवाय राहणार नाही. 

यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रतापराव पाचपुते, सहकार महर्षी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे मॅनेजर गणेश पाचपुते, जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरूमकर, प्रा.राम सोनवणे, राहुल साळवे आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या