हमीभाव केंद्रामुळे शेतकऱ्यांची परवड थांबणार : हभप बाबागिरी महाराज

शेतकरी हितासाठी व्यंकटेशकडुन हमीभाव केंद्राचे उद्घाटन




बोधेगाव (प्रतिनिधी)-

आजकाल जो तो फक्त स्वार्थासाठी जिवन जगत असताना व्यंकटेश ग्रूपचे संचालक यांनी मात्र आपली समाजाप्रती असलेली नाळ आणि सामाजिक बांधिलकी साबुत ठेवली आहे.त्यांनी समाजोपयोगी विविध कार्यक्रमाबरोबर आज शासनाने ठरून दिलेल्या शासकीय हमिभावाचे केंद्र बोधेगाव- बालमटाकळी सारख्या ग्रामीण भागात सुरु केल्याने शेतकऱ्यांची शेवगांवला जाण्या येण्यासाठी होणारी परवड थांबणार आहे असे मत केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत बाबा गिरी महाराज यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना गिरी महाराज म्हणाले कि, शेतकरी उत्पादन घेत असताना उत्पादन आणि खर्च याचा हमिभावाप्रमाणे दर मिळत नसल्याने त्याच्या खर्चाचे बजेट कोलमडले जाते, शेतकऱ्यांना शासकीय हमिभावाप्रमाणे धान्याला दर मिळाला तर त्याला शासकीय आनुदान आणि विम्याची गरज रहाणार नाही, परंतु हमिभावाप्रमाणे त्याला व्कचितच दर मिळाला जातो. शेअर बाजारातील सेंसेक्स वाढला तर झळाळी आली म्हणतात आणि शेतकऱ्यांच्या मालाचा दर वाढला तर त्याला महागाई म्हणतात अशी शोकांतीका शेतकऱ्यांची आहे.भविष्यात गोर-गरिब अंध परित्यक्ता यांच्या मदतीसाठी प्रयत्न कराण्याचे अवाहन महंत बाबागिरी महाराज यांनी केले.

यावेळी चेअरमन अभिनाथ शिंदे यांनी सांगितले कि, व्यंकटेशचे दोन लाख सभासद आहेत. समाजोपयोगी अनेक कार्यक्रम आम्ही व्यंकटेश ग्रूपच्या माध्यमातून घेत आहोत यामध्ये गोशाळा, शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी व्याख्याने, कार्यशाळा, उद्योग धंद्यासाठी नवनविन संकल्पना मार्गदर्शन, दाळ मिल, आणि आता शासकीय हमिभाव केंद्राचे उद्घाटन केले असुन समाजासाठी आपण काहितरी देनं लागतो म्हणून भविष्यात त्यांच्या साठी प्रयत्न करणार आहोत. साईधामच्या मागे  जुना हातगाव रस्त्यालगत असलेल्या शासकीय हमिभाव केंद्राचे उद्घाटन केदारेश्वरचे मठाधिपती महंत बाबा गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या आध्यक्ष स्थानी मोहनराव देशमुख, प्रमुख पाहुणे- प्रभाकर काका हुंडेकरी तर यावेळी बाळासाहेब देशमुख, रामनाथ राजपुरे, सुधाकर तहकीक, प्रशांत देशमुख, ज्ञानदेव घोरतळे, भारत पठाडे, विक्रम बारवकर, भारत देशमुख, संदिप बामदळे, मधुकर पाटेकर सह व्यंकटेश उद्योग समुहाचे चेअरमन अभिनाथ शिंदे,  संचालक व्यंकटराव देशमुख, अनिल गुंजाळ,कृष्णा मसुरे अभंग मनोज शेतकरी बप्पासाहेब भाकरेसह परिसरातील उडीद, मुग, तुर घालण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या