परिसरात घुमताहेत काकड आरतीचे नादमधुर मंजुळ स्वर


ओतूर 

जवळील डोमेवाडी येथे कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरती महोत्सव सुरू झाला आहे अशी माहिती डोमेवाडी ओतूरचे सामाजिक कार्यकर्ते बबनराव भोरे यांनी दिली.

 या गावची गेले २५ वर्षांपूर्वीची ही परंपरा आहे हा काकड आरती महोत्सव श्री विश्वंभर मंदिरात होतो.

ही काकड आरती पहाटे साडेतीन वाजता सुरू होते व सकाळी सात वाजता संपते  या काकड आरतीसाठी दररोज नित्य नियमाने सुमारे ४० ते ५० भाविक  वेळेत हजर होतात यात भजनी मंडळाचे कार्यकर्ते भाविक पुरुष महिला युवक काही लहान मुले यांचा समावेश आहे. काकड आरतीत प्रारंभी मंगलाचरण  काकडा,वासुदेव,बोधला,आंधळे,गौळणी आदि भजनाचा गीतांचा समावेश आहे

या काकड आरतीसाठी तुकाराम डुंबरे  बबनराव भोरे बाबाजी डुंबरे,शरद डुंबरे, मंगेश डुंबरे,नारायण डुंबरे अशोक भोरे महिला कविता डुंबरे,शकुंतला डुंबरे  सुलोचना भोरे,अनिता डुंबरे प्रमिला भोरे  व इतर भाविक युवक उपस्थित असतात. 

या काकड आरतीची सांगता श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात कार्तिकी पौर्णिमेला होते ही गेली २५ वर्षाची परंपरा आहे श्री क्षेत्र ओतूर येथून विशेष खाजगी बस करुन  भाविकांना नेते व आणते.ही परंपरा ग्रामस्थ मनोभावे जपत आहेत अशी माहिती बबनराव भोरे यांनी दिली.

श्री.क्षेत्र ओतूर ( ता जुन्नर ) येथील पांढरी मारुती मंदिरात समस्त ग्रामस्थ ओतूर ,श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था ओतूर, बाबाजी चैतन्य प्रासादिक भजनी मंडळ ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरती महोत्सव सुरू आहे अशी माहिती ह.भ.प शांताराम वाकर महाराज यांनी दिली.

या काकड आरतीची अधिक माहिती देताना वाकर महाराज म्हणाले आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्याला चातुर्मास म्हणतात या चातुर्मासात देव झोपलेले असतात  अशी भाविकांची वारकर्यांची श्रद्धा पूर्वपरंपरागत आहे अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेपासून ते कार्तिकी  पौर्णिमेला देवांना झोपेतून जागे करण्यासाठी काकडा भजन व आरती केली जाते अशी माहिती दिली.

ओतूर येथील पांढरी मारुती मंदिरात या कालखंडात पहाटे ४ वाजता  काकडा भजन व आरती सुरू होते व सकाळी ७ वाजता आरती संपते. 

प्रारंभी " उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा,

          झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ "

असे म्हणून मंगलाचरण गायले जाते काकड आरतीची विविध भजने गायली जातात.काकड आरती मुळे सर्व परिसर जागा होतो  या काकड आरतीसाठी दररोज सुमारे ३० ते ३२ भाविक वारकरी नित्यनेमाने हजर असतात प्रत्येक जण अभंग पदे गौळणी गातात या आरती साठी ह.भ.प शांताराम वाकर, प्रभाकर टिकेकर संजय डुंबरे, मच्छिंद्र डुंबरे, लक्ष्मण धुमाळ,बाजीराव बोचरे,दत्तात्रय पावडे, शोभा तांबे, आमले, सुनंदा डुंबरे, विजया मस्करे जयवंताबाई तांबे, पार्वताबाई डुंबरे आदी महिला वारकरी नित्यनेमाने उपस्थित असतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या