शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करा : प्रहारचे ठिय्या आंदोलन


शेवगाव प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा सुरू करा या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने प्रहार संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष संदीपराव बामदळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. १७ रोजी शेवगाव येथील महावितरण विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. 

सदरील प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या दोन दिवसांपासून शेवगाव तालुक्यातील वीज पुरवठा बिल भरण्यासाठी खंडित केला आहे. शेतकरी बांधव मोठ्या अतिवृष्टीमुळे तसेच पूरपरिस्थितीमुळे अडचणीत आहे. त्यामुळे बिल भरणे शक्य नाही. तरी आपण तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा. व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. जर आपण वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी भातकुडगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांनी शेवगाव येथील महावितरण विभागाला दिले आहे. यावेळी प्रहार संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष संदीपराव बामदळे, महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, चंद्रकांत फटांगरे, युवक अध्यक्ष कल्पेश दळे, अशोक कुसळकर, विकास गटकळ, मोहनराव मस्के, देवदत्त साळवे, हरीचंद्र जाधव, संजय फाटके, अनिल मेरड, अशोक पंडित यांच्यासह आदी प्रहारचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या