महाराष्ट्र केसरी तालुका चाचणी स्पर्धा उत्साहात


बोधेगाव 

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे नुकतेच रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र केसरी शेवगाव तालुका चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेसाठी शेवगाव तालुक्यातुन १०० ते १२५ मल्लांनी हजेरी लावली आहे. शेवगाव तालुका तालीम संघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष विक्रमराव बारवकर तसेच कासमभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कुस्ती स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेसाठी विजयी खेळाडूमध्ये ५७ किलो वजन गटामध्ये ( माती मध्ये ) उमेश चव्हाण, ६१ किलो वजन गटामध्ये ( माती मध्ये ) विश्वास पंडित, ७० किलो वजन गटामध्ये ( माती मध्ये ) वैभव सगळे, ७४ किलो वजन गटामध्ये ( माती मध्ये ) अक्षय काजळे, ८६ किलो वजन गटामध्ये ( माती मध्ये ) संग्राम काकडे,  ९२ किलो वजन गटामध्ये ( माती मध्ये ) रवी काळे, तर ७९ किलो वजन गटामध्ये ( मॅट मध्ये ) शुभम जाधव, ८६ किलो वजन गटामध्ये ( मॅट मध्ये ) मयुर जाधव, ८९ किलो वजन गटामध्ये ( मॅट मध्ये ) शंकर बागडे, तर ९२ किलो वजन गटामध्ये ( मॅट मध्ये ) सागर कोल्हे हे विजयी झाले असून या सर्व विजयी खेळाडूंची जिल्हा स्तरीय खेळासाठी निवड  झाली आहे. अशी माहिती शेवगाव तालुका तालीम संघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष विक्रमराव बारवकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष कासम शेख, अशोक खिळे, संदीप देशमुख, संदीप शिंदे, अनिल परदेशी, संतोष बागडे, शंकर बागडे यांच्यासह आदी ग्रामस्थ तसेच परिसरातील मल्ल आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या