राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत सैनिक विद्यालयाचे घवघवीत यश


लोणी 

उत्तरप्रदेशातील बाराबंकी येथे झालेल्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सैनिक विद्यालयाच्या कॅडेट सम्यक सुर्वे आणि कॅडेट हर्षल पाटील यांनी  अकराव्या नॅशनल फिल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पयनशिप टुर्नामेंट मध्ये सहापैकी चार सुवर्ण व दोन रजक पदके मिळून मोठं यश संपादन केले अशी माहीती प्राचार्य राजेश माघाडे यांनी दिली. 

या स्पर्धा उत्तर प्रदेश आर्चरी फील्ड असोसिएशन यांनी आयोजित केली होती. विविध राज्यातून सुमारे २२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या  सुवर्ण वीरांना तिरंदाजी प्रशिक्षक प्रा.  कुंडलिक आठवे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.या स्पर्धेत कॅडेट सम्यक सुर्वे याने १४ वर्ष वयोगटात वैयक्तिक सुवर्ण व सांघिक रजत पदक पटकावले. त्याच बरोबर १७ वर्षे वयोगटातही वैयक्तिक सुवर्ण व सांघिक सुवर्ण असे दुहेरी यश संपादन केले.कॅडेट हर्षल पाटील याने  १७ वर्ष वयोगटात  वैयक्तिक रजत पदक आणि सांघिक सुवर्णपदक मिळवले.

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंञी आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा षरीषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे ,खा.डॉ.सुजय  विखे पाटील,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ,सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक प्रा.विजय आहेर विद्यालयाचे कमांडंट कर्नल भरतकुमार, ज्योती कौशिक आदींनी अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या