१४ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संपन्न


जेजुरी प्रतिनिधी :

सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुळगावी खानवडी ता. पुरंदर येथे आयोजित केलेल्या १४ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनावेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष अजिंक्यभैय्या टेकवडे यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अजिक्यभैय्या टेकवडे यांची निवड करण्यात आली होती.

यावेळी बोलताना अजिंक्य टेकवडे म्हणाले की तरुणांनी महात्मा फुले यांचा आदर्श घेऊन तसेच त्यांचे विचार आत्मसात करून उच्च शिक्षणाची कास धरली पाहिजे तरच स्वतःच्या प्रगतीसह समाजाचा देखील विकास साधता येईल.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक डॉ. श्रीपाल सबनीस सर, ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके, रावसाहेब आण्णा पवार, विजयदादा कोलते, सुदाम आप्पा इंगळे, शिवसेना नेते रमेश आबा इंगळे, बहुजन हक्क परिषदेचेअध्यक्ष सुनीलतात्या धिवार, संभाजी ब्रिगेड पुरंदरचे अध्यक्ष संदीप बनकर, बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेशा ध्यक्ष श्रीकांत होवाल, दशरथ यादव, संजय सोनवणे, प्रा. गंगाराम जाधव, राजाभाऊ जगताप, शामकुमार मेमाणे,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर ,कुंभारवळण गावचे सरपंच अमोल कामठे, डॉ. विशाल कांबळे, विशाखा कांबळे, गायक उमेश गवळी , अभिनेते प्रकाश धिंडले, नानासाहेब निवाळकर बहुजन हक्क युवक नेते, माजी सरपंच दीपक जावळे , युवक, महिला भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या