एक पाऊल विकासाकडे संकल्पना राबवणार
वाडेगव्हाण / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाणमध्ये दिपावली निमित्त समप्रभा शिक्षण संस्था व माझा गावं माझी माणसं आयोजित दीपावली स्नेहभेट संवाद व घरगुती गणपती सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून एक पाऊल विकासाकडे या संकल्पनेतून गावच्या सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गावातून कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या ग्रामस्थांचा स्नेहभेट व संवाद मेळाव्यासाठी निवृत्त कर्नल साहेबराव शेळके, जिल्हा बँकेचे वरीष्ठ आधिकारी संजय शेळके माजी सरपंच सुरेश बो-हुडे, प्रसिद्ध चित्रकार श्रीहरी पवळे सर ,नानासाहेब शेळके,धनंजय नाईक त्याचप्रमाणे माझा गावं माझी माणसं नारायणगव्हाण येथील अनेक सभासद उपस्थित होते. या वेळी निवृत्त कर्नल साहेबराव शेळके,माजी सरपंच सुरेश बोरुडे,नानासाहेब शेळके,गणेश शेळके यांनी गावातील अनेक समस्यांविषयी आपले मत मांडून तो सोडवण्यासाठी कशा पद्धतीने उपाय योजना करता येईल याविषयी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रितीलता हांडे व सौ.जया कुरंदळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनंजय नाईक सर यांनी केले.
आदर्श गाव संकल्पना सर्वांगिण विकासासाठी प्रेरक!
माझ गाव माझी माणसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यामध्ये गावांमध्ये अनेक नवनवीन उपक्रमाचे नियोजन करणार आहे. यामध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक संकुल, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय त्याच बरोबर स्पर्धा परीक्षांचे नियोजनाचा समावेश आहे. नारायणगव्हाण एक आदर्श गाव कसे निर्माण होईल या दृष्टीने संकल्प केला आहे.
-श्रीहरी पवळे(चित्रकार)
-संजय शेळके( वरिष्ठ अधिकारी जिल्हा बँक.)
0 टिप्पण्या