ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आदरांजली


उरुळी कांचन  प्रतिनिधी 

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन उरुळी कांचन येथे बाळासाहेबांच्या प्रतिमा पूजनाने आदरांजली समर्पित करून साजरा करण्यात आला. 

हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने उरुळीकांचन येथील राम मंदिरात आयोजित कार्यक्रमात हवेली तालुक्यातील जुन्या जाणत्या जेष्ठ शिवसैनिकांचा, विविध शासकिय समितीवर व पक्षाच्या विविध पदावर नियुक्ती झालेल्या शिवसैनिक आणि कोव्हिड काळात उत्कृष्ट काम केलेल्या कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. 

शिवसेनेच्या विचाराने प्रेरित होऊन उरुळीकांचनचे माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज गुलाब टिळेकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी जिल्हा उपप्रमुख काळुराम मेमाणे, तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, जिल्हा संघटक रमेश भोसले, युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव, महिला आघाडी जिल्हा संघटिका श्रद्धा कदम,तालुका संघटिका छाया महाडिक,जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब कांचन, राजेंद्र बोरकर,बापुसो तुपे,कृष्णा कांचन, संजय गोलांडे यांचेसह हवेली तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या