यशवंतराव होळकर विद्यालयात दीपोत्सव


खेड (ता.) प्रतिनिधी 

महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव या ठिकाणी बजरंग दल वाफगाव व माय सह्याद्री पुणे दरवर्षीप्रमाणे पाडव्यानिमित्त याही वर्षी दीपोत्सव कार्यक्रमाचे यांनी आयोजन केले. तसेच कार्यक्रमासाठी वाफगाव गावातील सर्व ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच गावातील सर्व महिला भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर महाराजा यशवंतराव होळकर समितीचे वाफगाव अध्यक्ष योगेश राजे होळकर. तसेच भगवान दराडकर, बापूसाहेब सिनलकर, बजरंग दलाचे अध्यक्ष ओंकार सोनार, संकेत आर्वीकर, बजरंग दलाचे सर्व संयोजक, त्याचप्रमाणे गावचे सरपंच उमेश रामाणे, ऍड.अमोल टाकळकर, धनंजय भागवत, अमरभाऊ बोऱ्हाडे अ.जा.मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, पोलीस पाटील माऊली कराळे, वरुडे गावचे उपसरपंच आशाताई तांबे, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सोमनाथ वाफगावकर साहेब, तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी संपूर्ण किल्ला दिव्यांनी उजळून टाकला होता. तसेच शुभम कानपिळे यांनी किल्ल्यावर विद्युत रोषणाई केली होती. संपूर्ण किल्ला विद्युत रोषणाईने आणि दिव्यांनी पूर्ण उजळून निघाला होता. तसेच किल्ल्यासमोर भव्यदिव्य रांगोळी काढून सजावट केली होती. यावेळी बजरंगदलाच्या वतीने  सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.  ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या