स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारासाठी जेजुरी नगरपरिषदेची सलग दुसऱ्यांदा बाजी


जेजुरी प्रतिनिधी

केंद्र शासनामार्फत दिला जाणारा देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत चा कचरा मुक्त शहर पुरस्कार अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरपरिषदेला दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात नुकताच वितरीत करण्यात आला. जेजुरी नगरपरिषदच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, व मुख्याधिकारी पूनम कदम यांनी यावेळी उपस्थित राहून संपूर्ण जेजुरीकरांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. शनिवार दि. २० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्रालयालाचे सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा,सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप करण्यात आले. 

जेजुरी नगरपरिषदेला या 

अभियानात दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला असल्याने जेजुरीकरांकडून नगरपरिषद चे अधिकारी वर्ग, कामगार वर्ग, नगरसेवक व या पुरस्कार मिळण्याकरिता अहोरात्र काम करणाऱ्या सफाई कामगारांचे कौतुक होत आहे.

नगरपरिषद तर्फे घरोघरी जाऊन कचऱ्याबाबत योग्य ती जनजागृती करून , सुका व ओला कचरा अशी व्यवस्थित वर्गवारी करून कचरा गोळा करण्यात आला. टाकाऊ पासून टिकाऊ ची निर्मिती, कंपोस्ट खत निर्मिती करण्यात आली. यासाठी आमदार मा. संजय जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या