शेवगाव प्रतिनीधी
राज्य
परिवहन आगाराचे बस चालक दिलीप काकडे यांनी केलेली आत्महत्या ही दुदैवी
घटना आहे. काकडे कुटुंबावर या घटनेने मोठा आघात झाला असून त्यांच्या दुःखात
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. काकडे यांच्या आत्महत्येप्रकरणी
परिवहन मंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी मनसेचे नेते दिलीप
(बापू) धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्य
परिवहनचे कर्मचारी बसचालक दिलीप काकडे यांनी नुकतीच आत्महत्या केली.
दरम्यान मनसेचे दिलीप धोेत्रे व राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आव्हाणे
येथे जावून मयत कर्मचारी काकडे यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तत्पुर्वी
शेवगाव येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
यावेळी
मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, संभाजीनगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष
दिलीप बनकर, शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष
जिरेसाळ, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, रस्ते आस्थापना विभागाचे शेवगाव
तालुकाध्यक्ष सागर आधाट, गणेश डोमकावळे, ज्ञानेश्वर कुसळकर, उपतालुकाध्यक्ष
रामेश्वर बलिया, देविदास हुशार, संजय वणवे आदी उपस्थित होते.
दिलीप
धोत्रे म्हणाले, बसचालक दिलीप काकडे यांनी आत्महत्या केली असून त्यांनी
परिवहन कर्मचार्यांच्या मागण्यासाठी बलिदान दिले आहे. शासनाने परिवहन
कर्मचार्यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजे. परिवहन महामंडळाच्या
कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय
घ्यावा. एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून आता इंधनदरवाढीमुळे
एसटीनेच प्रवास करावा लागत आहे. एसटीचे कर्मचारी हे जोखमीचे काम जबाबदारीने
पार पाडत आहेत. यामुळे एसटीचे कर्मचारी व एसटी वाचली पाहिजे, ही भुमिका
मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची आहे. या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत.
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांची काळजी घेण्यासाठी ‘माझे
कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना आणली. मात्र मुख्यमंत्र्यांनी
सर्वसामान्यांची काळजी घेण्याऐवजी फक्त आपल्याच कुटुंबाची काळजी घेतली.
मात्र या कोरोना संकटाच्या काळात मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून
सर्वसामान्यांच्या मदतीला धावला.
ऊस उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी दि. 12 नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.
पत्रकार
परिषदेनंतर आव्हाणे येथे जावून काकडे कुटुंबातील सुनिता काकडे, मुले- सतिश
काकडे, महेश काकडे, मुलगी ज्योती घनवट, भाऊ- शिवाजी काकडे यांचे सांत्वन
केले. यावेळी दिलीप धोत्रे व प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या हस्ते
मनसेच्यावतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी काकडे यांच्या
वारसाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, परिवहन कर्मचार्यांचे प्रश्न
सोडवण्यासाठी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे
धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी
एसटी कर्मचारी संघटनेचे दिलीप लबडे, संजय धनवडे, संतोष सोंडे, दिलीप बडधे,
इस्माईल पठाण, लक्ष्मण लव्हाट, अजय कराड, रावसाहेब जाधव, राजेंद्र घुगे,
अरुण गर्जे यांच्यासह मनसेचे लक्ष्मण अभंग, प्रकाश सुसे, अमिन सय्यद,
नामदेव चेडे, सोमनाथ आधाट, किशोर भागवत, मोहन गुंजाळ, नवनाथ भागवत, योगेश
भागवत, योगेश गरड, संदीप वाघ, सुहास तुतारे, कम्युनिस्ट पक्षाचे संजय
नागंरे, निवृत्ती आधाट, गजेन्द्र डाके, संदीप देशमुख, विठ्ठल दुधाळ, बाळा
वाघ, दिलीप सुपारे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या