पाणी पुरवठा नियमित करा मग जनजागृती करा


जेजुरी प्रतिनिधी

जेजुरी शहरात नियमित होत नसलेला पाणीपुरवठा अगोदर सुरुळीत करा , पाणी कसे वापरावे व पाण्याची बचत कशी करावी? याची जनजागृती नंतर करा, तुमच्या नाकर्तेपणा मुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे असा टोला विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. केवळ वीजबिलाचे कारण सांगून नागरीकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचे बारभाई यांनी बोलताना सांगितले. वीजबिल खर्च, मेंटेनन्स,पाईप लाईन तुटफूट ही कारणे न सांगता मांडकी डोहातून व नाझरे धरणातून पाणी उचलून नागरीकांना नियमितपणे पाणीपुरवठा नगरपालिका प्रशासनाने केला पाहिजे इथुन मागे नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना देखील नागरीकांना नियमितपणे पाणीपुरवठा होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या