आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यात वारकरी परंपरा जोपासत टाळ, विना, मृदंगांच्या साथीत अखंड हरिनाम गजर करीत श्रीगुरू हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव ७२५ व्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास शनिवारी हरी नाम गजरात सुरुवात झाली.
कार्तिकी यात्रेनिमित्ताने माऊली मंदिरात पहाटे घंटानाद झाला. त्यानंतर माऊलींच्या संजीवनी समाधीवर पावमान अभिषेक झाला.
सकाळी नऊ च्या दरम्यान पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर आणि कुटुंबाच्यावतीने आकर्षक फुलांनी सजवलेल्या श्रीगुरू हैबतबाबा यांचे पायरीचे वारकरी परंपरेने विधिवत पूजा करण्यात आली. श्रीगुरू हैबतबाबा पायरी पूजे दरम्यान पादुकांची विधीवित पूजा करताना वेद मंत्राच्या जयघोषता दूध,दही,मध,साखर,तूप,अत्तर, पुष्पहार,फुले अर्पण करून प्रसाद महानैवेद्य झाला.यावेळी पूजेचे पौरोहित्य वेदमुर्ती श्रीनिवास कुलकर्णी,अमोल गांधी आणि श्रीरंग तुर्की यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण,संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई,विश्वस्त अभय टिळक,विकास ढगे पाटील,मुख्याधिकारी अंकुशराव जाधव,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,श्रीधर सरनाईक,मानकरी योगिराज कुर्हाडे,योगेश आरू,माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील,राजाभाऊ रंधवे,थोरल्या पादुका मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णू तापकीर,आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे,पोलिस नाईक मछिंद्र शेंडे,माजी नगरसेवक डी.डी.भोसले,अजित वडगावकर,संतोष गावडे,ज्ञानेश्वर गुळुंजकर,माऊली दिघे,विठ्ठल घुंडरे,प्रसाद बोराटे आणि दिंडीतील वारकरी उपस्थित होते.
श्रीगुरू हैबतबाबा यांच्या ओवरीत पूजा,आरती झाली.ओवरीत प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या उपस्थितीत प्रथपरंपरांचे पालन करीत पूजा विधी झाला.मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते विश्वस्त व मानकऱ्यांचा नारळ प्रसाद देवून सत्कार झाला.
0 टिप्पण्या