गृहनिर्माण क्षेत्र वाटचालीस सज्ज


पुणे प्रतिनिधी

कोरोना काळातील विस्कटलेली सर्वच व्यवसायांची घडी आता हळूहळू का होईना, पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

मागील दीड वर्षात ठप्प असलेले व्यवसाय काही प्रमाणात वेग घेत असताना गृहनिर्माण क्षेत्रदेखील आपली वाटचाल करण्यास सज्ज झाले आहे.

देशातील लाखो लोकांना रोजगार पुरविणारे दुसऱया क्रमांकाचे क्षेत्र असलेले व जीडीपीमध्ये किमान 5 ते 7 टक्के इतका वाटा असलेले बांधकाम व्यवसाय क्षेत्र नजीकच्या भविष्यासंदर्भात आशावादी आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आणि सध्या सुरू असलेला सण व उत्सवांचा काळ यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहेच, शिवाय टाळेबंदीच्या काळात नागरिकांना स्वतःचे घर असल्याचे फायदे लक्षात आल्यानंतर गृहखरेदी करण्यास ग्राहकदेखील उत्सुक असल्याचे चित्र आहे.

टाळेबंदीदरम्यान क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले. ज्यामध्ये शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन खाटांसोबत डिफ्रिब्रिलेटर, सक्शन मशीन व ईसीजी मशीन उपलब्ध करून देण्यात आले होते. बाणेर येथील महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयाला पाच व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस, पिंपरी- चिंचवडमधील थेरगाव येथील महानगरपालिका कोविड रुग्णालयालादेखील पाच व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस आणि डी. वाय. पाटील रुग्णालयात खास पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या कक्षासाठी पाच व्हेंटिलेटर व्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले.

टाळेबंदीच्या काळात बांधकाम व्यावसायिक व व्रेडाई पुणे मेट्रोने आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेत प्रकल्प साईटवरील बांधकाम मजुरांची सर्व जबाबदारी स्वीकारली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या