मतिमंद मुलांसमवेत ग्रामसेवकांची दिवाळी


मिरजगाव 
               

ग्रामसेवक महाराष्ट्र ग्रुप व ग्रामसेवक सोशल फाउंडेशन मधील राज्यभरातून आलेल्या ग्रामसेवकांनी सातारा येथील एहसास मतिमंद मुलांचे बालगृह येथे सर्व मुलांना कपडे व स्नेहभोजन देवून आपली दिवाळी त्यांच्या समवेत साजरी केली.

ग्रामसेवक महाराष्ट्र ग्रुप व ग्रामसेवक सोशल फाउंडेशन या संस्थेने राबविलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे समाजात एक नवीन पायंडा पडला आहे.

या राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

एहसास मतिमंद मुलांचे बालगृह येथील मुलांसोबत दिवाळी साजरी करत असताना ग्रामसेवक सुरेश गावंडे (वाशिम), मधुकर मोरे (नांदेड) व अनिल भोईटे (अहमदनगर) यांनी आपल्या मुलांचा वाढदिवसाला होणारा खर्च टाळून बालगृहातील मतिमंद मुलांना मदत करण्याचा संकल्प केला. बालगृहातील उपस्थित मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन सर्वांन मंत्रमुग्ध केले. 

यावेळी ग्रामसेवक महाराष्ट्र ग्रुप मधील अमीर शेख (पुणे), शंकर जाधव (सातारा), विजकुमार बनाते (अहमदनगर), सी.एम शिंदे (सातारा), सुरेश मंडलिक (अहमदनगर), ज्योतीताई पाटील व अमोल घुले (सोलापुर), मेघश्याम बोरसे (धुळे), सुरेश गावंडे (वाशिम), योगगुरू मधुकर मोरे (नांदेड), बाळासाहेब धायगुडे, कैलास तरटे, अनिल भोईटे, डी.आर. राऊत, भारत देशमुख, राजेंद्र मेहेत्रे (अहमदनगर) संदीप सावंत (सातारा) आदी उपस्थित होते.

सर्व जिल्ह्यातून आलेले ग्रामसेवक, सभासदांनी स्वखर्चाने सलग चौथ्या वर्षी दिवाळी साजरी करुन एक आदर्श उपक्रम साजरा केला आहे. 


समाजातील सर्वांनी अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी समजून असे उपक्रम राबविले पाहिजे ही काळाची गरज आहे

- विजयकुमार बनाते, ग्रामविकास अधिकारी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या