विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांवर शिवसेनेचा बहिष्कार

मंत्री सत्तारांची गाडी अडवून शिवसैनिकांचा घेराव


मिरजगाव     
                     

आज दि.१३ रोजी कर्जतमध्ये होत असलेल्या विविध विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमावर कर्जत तालुका शिवसेनेने बहिष्कार टाकून मिरजगाव येथे मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवून घेराव घातला‌. 

कर्जत तालुका शिवसेनेने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्यातील महाविकास आघाडीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेची नाराजी दिसून आली.

कर्जत शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना बोलावून बैठक घेण्यात आली. 

यावेळी आमदार रोहित पवार महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना वेळोवेळी डावलून अपमानास्पद वागणूक देत आहेत. तसेच कुठल्याही कार्यक्रमात अथवा विकासकामांच्या बाबतीत विश्वासात घेतले जात नाही. असा आरोप सर्व शिवसैनिक तसेच तालुकाप्रमुख बळीराम यादव यांनी केला असून उदघाटन कार्यक्रमावर सर्वानुमते बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर पुढील काळात असेच होत राहिल्यास कर्जत तालुका शिवसेना भविष्यात आपली ताकद दाखवून देईल, असा इशारा तालुकाप्रमुख बळीराम यादव यादव यांनी दिला आहे.

आ.रोहित पवार हे महाविकास आघाडीचे आमदार म्हणून गेली दोन वर्ष मिरवत आहेत. मात्र, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचे बैठकीत उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी तक्रारी केल्या. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव, युवासेना तालुकाप्रमुख दिपक गांगर्डे, मा.उपसभापती प्रशांत बुद्धीवंत, महावीर शेठ बोरा, उपतालुकाप्रमुख सुभाष जाधव, शिवाजी नवले, बाळासाहेब निंबोरे, विभागप्रमुख पोपट धनवडे, अक्षय घालमे, चंद्रकांत घालमे, शहरप्रमुख अक्षय तोरडमल, बबन दळवी, महेंद्र धोदाड, अमोल सुपेकर, सुभाष सुद्रीक, नाजीम काझी, भारत काळे, अजित कानगुडे, राजू उकीर्डे, हरि बाबर, आण्णा बागल, अविनाश मते, लक्ष्मण जगताप, आप्पा शेंगडे, उद्धव जाधव, अकील पठाण, भैय्या शेख, रवी कुसकुडे आदी उपस्थित होते.

कर्जत मधील विविध विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमाला मंत्री अब्दुल सत्तार जात असताना मिरजगाव येथील क्रांती चौकात तालुक्यातील शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवून आपली नाराजी व्यक्त केली. तसेच मंत्र्यांनी कार्यक्रमाला जाऊ नये मागणी करत त्यांना घेराव घातला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या