पेठच्या उपसरपंचपदी विजया चौधरी बिनविरोध


लोणी काळभोर

पेठ (ता. हवेली)  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजया शरद चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच वर्षा चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. ही निवडणूक प्रक्रिया सरपंच सुरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. उपसरपंच पदासाठी विजया चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुरज चौधरी यांनी विजया चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. तर ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.

यावेळी माजी सरपंच बापुसाहेब चौधरी, महादेव चौधरी, रघुनाथ चौधरी, सोमनाथ चौधरी, रामदास चौधरी, माजी उपसरपंच सारिका चौधरी, मोहन चौधरी अर्जुन चौधरी, भालचंद्र चौधरी. पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, ग्रामपंचायत सदस्य तानाजी चौधरी, जयश्री चौधरी, शोभा चौधरी, लक्ष्मीबाई गायकवाड, मोनिका चौधरी, गणेश गायकवाड, सुजित चौधरी, राजेंद्र आढाव, गोपीचंद चौधरी, दादासाहेब चौधरी, तुळशीराम चौधरी, पंडीत  चौधरी  आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

या पदाच्या माध्यमातून  गावच्या सर्वागिण विकास करण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना एकत्र घेऊन प्रयत्न करणार आहे. तसेच विकासकामे करताना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवनिर्वाचित उपसरपंच विजया चौधरी यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या