सोमेश्वरमंदिर परिसर त्रिपुरी पौर्णिमानिमित्त झाला दिपमय

त्रिपुरी पौर्णिमा हा त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव!


सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

सर्वत्र मंदिर व परिसरात त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते. मंदिरातील दगडी दिपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो.

गुरुवारी 18 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, त्या विजयसोहळ्याची ओळख या पौर्णिमेला मिळाली आणि ती त्रिपुरी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. या अनुषंगाने जगभरातील मंदिरात आजच्या दिवशी त्रिपुर प्रकारची वात लावत हा दिवस कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत त्रिपुरी पौर्णिमा दिवस साजरा करत असतात.

बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसर तसेच असणाऱ्या दोन भव्य दीपमाळा त्रिपुरी पौर्णिमा निमित्त लावलेल्या दिंव्यांनी आकर्षक दिसत होती तर सोमेश्वरनगर परिसरातील महिलांनी आपले कुटूंब सुखी समृद्धी राहावे अशी प्रार्थना करत त्रिपुर प्रकारची वात  श्री सोमेश्वर शिवलिंग गाभारा व परिसरात लावत आनंद व समाधान व्यक्त केले.

कोरोनाच्या संकटामुळे गेले दोन वर्षे आम्ही मंदिर दर्शन व असे उत्सव केले नाही या वर्षी सोमेश्वर मंदिरात  त्रिपुरा उत्सव करताना खूप छान वाटत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या