नगरमध्ये बायो डिझेल रॅकेट!

बेकायदेशिर विक्री प्रकरणी 11आरोपींसह पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त


नगर 

नगर: जिल्ह्यात बायो डिझेलची बेकायदेशिर विक्रीप्रकरणी पोलिसांनी १ कोटी ७५ लाख ४० हजार ५०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह ११ आरोपींना नगर- सोलापूर रोडवरील वाटेफळ शिवारातून जेरबंद केले. या रॅकेटचा सूत्रधार सत्ताधारी पक्षातील मोठा राजकीय कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. आरोपींमध्ये मात्र अद्याप त्याचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही.

नगर जिल्ह्यात बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधनाची सर्रास विक्री सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांनी यावर आजा आवाज उठवल्यानंतर पोलीस महासंचालकांनी राज्यभर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार नगर पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार नगर- सोलापूर रोडवर वाटेफळ (ता . नगर) शिवारात हॉटेल स्वप्नील पाठीमागे मोकळ्या जागेत काही लोक विनापरवाना बेकायदा पिवळसर रंगाचे रसायनाची बायोडिझल म्हणून अनाधिकृतपणे विक्री करत होते. त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी तहसिलदार कार्यालयाकडून दोन शासकिय पंच व पुरवठा निरीक्षक वैशाली गजानन शिकारे यांना मिळालेल्या कारवाई करण्यासाठी बोलावून घेतले. पो. नि. कटके , सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , सहाय्यक फौजदार सोन्याबापु नानेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे , संदीप पवार, विष्णू घोडेचोर, दिनेश मोरे, भाऊसाहेब काळे, पोलीस नाईक शंकर चौधरी , लक्ष्मण खोकले, संदीप दरंदले, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, संतोष लोढे, सचिन आडबल, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिन्द्र बर्डे, योगेश सातपूते, रोहित येमूल, सागर ससाणे, मयूर गायकवाड, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, रविन्द्र घुंगासे, जयराम जंगले, चालक पोहेकॉ. अर्जून बढे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कूसळकर तसेच पुरवठा निरीक्षक वैशाली शिकारे यांनी हा छापा टाकला. यावेळी ०३ टँकर व ०२ ट्रक व बायो डिझेलचा साठा जप्त केला. विक्री करणारे व विकत घेणारे असे ११ जण अटक केले. 

त्यात अविनाश पोपटराव नाटक (वय २ ९ वर्षे , रा . दूधसागर सोसायटी , केडगांव , अहमदनगर), बंडू बाळासाहेब जगदाळे (वय - ३६ वर्षे , रा . रुई छत्तीशी , ता . नगर), विजय अशोक वाडेकर (वय ३१ वर्षे , रा . मंगलगेट , कोठला , अहमदनगर), योगेश भगवान गंगेकर (वय ४२ वर्षे , रा . वाटेफळ ता. नगर), चंद्रकांत शेखर सोनवने, मुजमील राजू पठाण (वय २३ वर्षे , रा . सातपूते गल्ली , केडगांव अहमदनगर) टँकर ड्रायव्हर सचिन दशरथ लामखडे  (वय- २३ वर्षे , रा . कातळवेढा , ता . पारनेर , जि . अहमदनगर), ट्रक ड्रायव्हर अरूण माधयन (वय- ३४ वर्षे , रा . तासम, नायकूमपट्टी , वमन्नूर , सेलम , राज्य- तामिळनाडू), ट्रक ड्रायव्हर वेडीआप्पा गंगा दूरई (वय- २४ वर्षे , रा . तांडरामपट्ट , तृणामलाई राज्य तामिळनाडू), बाबासाहेब सखाराम बोरकर (वय ४५ वर्षे , रा . भोयरे पठार , ता . नगर) यांचा समावेश आहे. 

त्यांच्याकडून ट्रेलर टँकर नं . एमएच ४६ एआर २४७७ , टँकर नं . एमएच १० झेड ४७२४ , टँकर नं . एमएच १२ सीटी ०६१ ९ , ट्रक नं . टीएन ५२ जे -७२८८ , ट्रॅक नं . टीएन ५२ एच ७४८५ , इलेक्ट्रिक मोटर , ४४,००० / - रु . बायो डिझेल , दोन कार , एक बोलेरो जिप , सहा मोबाईल , १,४४,५०० / - रु . रोख रक्कम असा एकूण १,७५ , ४० , ५०० / - रु . किं . चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या इसमाकडे जप्त करण्यात आलेल्या बायो डिझेल बाबत कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार संजय अशोक साबळे , रा . निल हॉटेल , केडगांव बायपास , केडगाव , अहमदनगर याचे व त्याचे साथीदारांचे सांगण्यावरुन विक्री करीत असल्याचे सांगीतले . त्यावरुन साथीदार आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत . तसेच संजय अशोक साबळे याची माहिती घेतली असता तो सध्या जेलमध्ये असून आरोपी संजय अशोक साबळे याचे विरुध्द यापुर्वी अनेक गुन्हा दाखल आहेत. 

तोफखाना पो.स्टेच्या निरीक्षक ज्योती गडकरी अधिक तपास करीत आहेत . 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या