उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा शृंगऋषी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान


बोधेगाव 

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शृंगऋषी प्रतिष्ठान व ग्रामपंचायत शिंगोरी यांचे संयुक्त विद्यमाने संत भगवान बाबा स्पर्धा परीक्षा अभ्यासिका शिंगोरी ता. शेवगाव येथे मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
शेवगांव तालुक्यातील शिंगोरी गावचे व विभुती प्रकाशनंदजी विद्यालय ठाणे याठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अर्जुन कुंडलिक चेमटे यांना मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव, पशुसंवर्धन व दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण विभाग पदी अशोक महादेव चेमटे यांची पदोन्नती, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत प्रवेश मिळवलेली पूजा अंबादास चेमटे तसेच औरंगाबाद येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत यश मिळवलेले आयुष शिरसाठ, गोविंद आव्हाड व वैजिनाथ चेमटे या मल्लांचा भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक संभाजी गुठे, कृषी पदाधिकारी आशोक उगलमुगले, राजेंद्र पोपळघट, राजेंद्र चेमटे, डॉ. ढाकणे, स्वप्निल बोडखे सह शृंगऋषी प्रतिष्ठान व ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व पदाधिकारी, आभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या